Loading
आमचा इतिहास

हेल्थ इंडिया टीपीए सर्विसेस् प्रा. लि. 2002 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे आणि आमचा आमच्या ग्राहकांना सर्वोच्च प्रतीची टीपीए सेवा देण्यामध्ये विश्वास आहे. आम्हाला आयआरडीएची मान्यता आहे (विमा नियामक आणि विकास प्राधिकरण - परवाना क्रमांक 022).

आमचे काम

हेल्थ इंडिया टीपीए सर्विसेस् प्रा. लि. कॅशलेस दाव्यांसाठी रुग्णालयात भरती होण्यासाठी तत्पर मदत आणि परतफेड दाव्यांची त्वरित भरपाई करतो, आणि म्हणूनच आम्ही आमच्या ग्राहकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा त्वरित मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही सानुकूल, उच्च दर्जाचे आरोग्य लाभदायी प्रशासनीय कार्यक्रम आणि त्यासंबंधित बाह्यस्रोत सेवा विमा कंपन्यांसाठी पूर्ण देशभरात पुरवितो.

आमची भूमिका

हेल्थ इंडिया टीपीए सर्विसेस् प्रा. लि. ग्राहकांच्या उपचारासंबंधी रुग्णालयांसोबत समन्वय ठेवते आणि विमा कंपनीच्या वतीने उपचारासाठी आलेला खर्च मंजूर करते. वास्तविक देयक विमा कंपनी करते. कायदेशीर करार हा विमा कंपनी आणि विमेदार ग्राहक यांच्यामध्ये असतो. विमेदार ग्राहकाला हेल्थ इंडिया टीपीए सर्विसेस् प्रा. लि. कडून एक ओळखपत्र दिले जाते. हे ओळखपत्र रुग्णालयात भरती होण्यासाठी गरजेचे असते.

आमची दृष्टी

एक असे व्यासपीठ तयार करणे ज्याद्वारे आम्ही सर्वोच्च दर्जाची आरोग्य सेवा देऊ. हे व्यासपीठ पूर्णपणे सेवा उत्कृष्टता, रुग्णाची देखभाल आणि सदस्यांसाठी आरोग्य शिक्षण यासाठी समर्पित आहे.

आमचे प्रमुख कार्य

आम्ही किमान शक्य खर्चामध्ये विमा ग्राहकांसाठी जलद, सोयीस्कर आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी बांधील आहोत.